जालना । वार्ताहर
जिल्हा सरकारी रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी दाखल असलेल्या तीन पुरुष रुग्णांचा आज शनिवारी ठराविक अंतराने मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. मेंदू ज्वर,लिव्हर वर आलेली सूज आणि कॅन्सर असा आजार असलेले हे रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते.आज शनिवारी एकाच दिवशी तिन्ही रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे संभ्रम निर्माण झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून तोडङ्गोड केल्याची माहिती देखील या सूत्रांनी दिली आहे.
Leave a comment