वडवणी । सुधाकर पोटभरे
तळहाताच्या फोडाप्रमाणे झेंडूची एकरभर बाग फुलविली . परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने खरेदीला एकही ग्राहक नाही.लाखोंचा फटका सहन करावा लागणार असल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथील बालासाहेब बाबरे या शेतकर्‍याने आपल्या व्यथा मांडत मदतीची मागणी केली आहे.
बालासाहेब बाबरे यांनी साधारण दोन महिन्यांपूर्वी एका एकरात पिवळा झेंडू लावला.30 हजार रूपये खर्च करून रोपे खरेदी केली . त्यानंतर नियमित पाणी देणे ,खुरपणी, खत घालणे, मजूरी,फवारणी आदी कामांसाठी आतापर्यंत 50 हजार रूपयांचा खर्च झाला. आता झेंडूची झाडे बहरात असून तोडणीला आली आहेत . परंतू संचारबंदीमुळे मजूर नाहीत आणि कसे तरी तोडले तर विकायचे कोठे ? असा प्रश्न बाबरे यांच्यासमोर आहे.जवळपास 10 क्विंटल झेंडू निघतील असा विश्वास बाबरे यांनी व्यक्त केला असून आठवडाभरात ते तोडले नाहीत तर लाखोंचे नुकसान त्यांना सहन करावे लागणार आहे.कृषी विभागाने याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बालासाहेब बाबरे यांच्यासह इतर फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांनी केली आहे.
पहिल्यांदाच केले धाडस
अगोदरच दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते.अशा स्थितीतही थोड्याफार पाण्यावर झेंडूची फुल शेती करण्याचे धाडस बाबरे यांनी केले होते . परंतु पहिल्याच वेळी त्यांना कोरोनाचा फटका सहन करावा लागत आहे. नगदी पीक मिळेल आणि त्यावर कुटूंबाचा गाडा चालविता येईल, या उद्देशाने त्यांनी ही शेती केली होती.परंतू त्यांनी केलेले नियोजन कोरोनामुळे पाण्यात गेले आहे.
शासनाने मदत द्यावी
नगदी पैसे येतील या उद्देशाने एकरभर झेंडूची झाडे लावली.आता झेंडू तोडायला आला आहे.परंतू बंदमुळे तो विकायचा कोठे? हा प्रश्न आहे. जवळपास 10 क्विंटल फुले निघू शकतात.यामुळे लाख रुपयांचा फटका बसला आहे.आता यावर शासनाने काही तरी मदत करुन आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी बालासाहेब बाबरे यांनी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.