शेतकरी,भाजीपाला विक्रेत्यांना त्रास देवू नका
आ.संदिप क्षीरसागर यांच्या पालिका प्रशासनाला सूचना

बीड । वार्ताहर
शहरात भाजीपाला धान्य घेऊन येणार्या शेतकर्यांना आडत मार्केटमधील भाजीपाला,फळे विक्रेते यांना विनाकारण त्रास होता कामा नये, पालिकेने त्यांना ओळखपत्र द्यावे अशा सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी करून शेतकरी भाजीपाला विक्रेते यांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही केले आहे. यानंतर बीड येथील भाजीपाला आडत मार्केटसह फळ विक्रेत्यांचा बेमुदत बंद मागे घेण्यात आला आहे. उद्यापासून जिल्हाधिकार यांनी ठरवून दिलेल्या वेळेत ही बाजार पेठ खुली राहणार आहे.
बीड शहरात दोन दिवसापूर्वी नगरपालिका कर्मचार्यांनी आडत मार्केटमधील भाजीपाला विक्री करणार्या शेतकर्यांना, व्यापार्यांना मारहाण केली होती. या प्रकारामुळे फळे, भाजीपाला विक्री त्यासह आडत मार्केटमधील व्यापार्यांनी काल बेमुदत संप करून आक्रमक भूमिका घेतली होती. यावर आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम यांनी बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांच्याशी चर्चा केली. कोरोनाशी लढत असतांना सर्वांचे सहकार्य महत्त्वाचा आहे, अशा परिस्थितीत विनाकारण शेतकर्यांना व्यापार्यांना त्रास होऊ नये अशी भूमिका आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली. यावर मुख्याधिकारी, अडत मार्केटमधील भाजीपाला विक्रेते, शेतकरी प्रतिनिधी यांच्यातील चर्चेअंती गेटवर शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी बांधव, पालिका प्रशासन यांचे प्रतिनिधी उभा राहतील गर्दी होणार नाही. याची खातरजमा करतील, सर्वांना ओळखपत्र दिले जाईल असे ठरले त्यानुसार भाजीपाला आडत मार्केटमधील व्यापार्यांनी आपला बंद मागे घेतला असल्याचे जुनेद बागवान यांनी सांगितले आहे. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, तहसीलदार किरण आंबेकर, मुख्यधिकारी उत्कर्ष गुट्टे, मुजीब शेख, जुनेद बागवान आदी उपस्थित होते.
मारहाण करणार्‍या कर्मचार्‍यांवर होणार कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यात भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकर्यांना व व्यापार्यांना पालिकेतील कर्मचार्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी असलेल्या कर्मचार्‍यांवर कार्यवाही केली जाणार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.