अंबाजोगाई । वार्ताहर
राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.रक्तदान करा या आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व महसूल मंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी स्वत: कार्यकर्त्यांसह रक्तदान केले.येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या ब्लड बँकेत शुक्रवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.पहिल्याच दिवशी 41 जणांनी रक्तदान केले.पुढील काही दिवसांत रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने 500 जण रक्तदान करतील अशी माहिती आयोजक बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिली.
सध्या अंबाजोगाईसह राज्यात लॉकडाऊनची परस्थिती आहे.दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार जिल्हा काँग्रेसने अगदी कमी वेळेत शुक्रवार,दिनांक 3 एप्रिल रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते या शिबिरात बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक वाजेद खतीब,राणा चव्हाण,शेख मुख्तार,सय्यद अमजद सय्यद शब्बीर,निखिल मनोज लखेरा,मयूर मनोज लखेरा,महेश वेदपाठक,ऋषिकेश लोमटे, नरसिंग साबणे,चेतन परदेशी,पाशा गवळी,कल्याण सरवदे,धनंजय सुर्वे, सतीश दरवेशवार,अनिल भंडारे,दयानंद गुजर,रघु जाधव,रमेश सुरेवार,शाकेर पठाण,अनिस खान पठाण,संदीप दरवेशवार,नितीन जाधव,रियाज खान पठाण,शंकर गवळी,अनंत कांबळे,किशोर बलुतकर,आशुतोष पवार,रईस खान पठाण,सय्यद आतिफ हसन,सय्यद इलाही रियाज,राजेश कोकाटे,शेख अतीख,सुरज नखाले,शेख लतीफ, बाबूलाल मुजावर,शेख मोहम्मद रहमान आदींनी रक्तदान केले.रक्तदान शिबिर प्रसंगी स्वा.रा.तीचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख,नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक धम्मपाल सरवदे,सहयोगी प्राध्यापक डॉ.अरविंद बगाटे,प्रभारी अधिकारी डॉ.विनय नाळपे हे उपस्थित होते.तर शिबिरासाठी रक्त संक्रमण अधिकारी डॉ.दत्ता चिकटकर,डॉ.रमा साठवणे, तंत्रज्ञ सय्यद मुश्ताक,किरण चव्हाण,परिचर महेबूब शेख,श्रीराम कुंजटवाड यांचे सहकार्य लाभले.
रक्तदात्यांना दिली वेळ
सकाळी 9 ते 12 या वेळेत रक्तदात्यांना वेळ ठरवून देण्यात आली होती.त्यामुळे रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दीही झाली नाही.आयोजक,रक्तदाते आणि ब्लड बँकेच्या डॉक्टर व कर्मचा-यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत प्रत्येकांमध्ये किमान एक मीटर इतके अंतर ठेवून सॅनिटायझर आणि मास्कची सुविधेचा वापर केला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.