जालना । वार्ताहर
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जालना येथील कोव्हीड हॉस्पीटलसाठी सीआरआर ङ्गंडातुन 20 पोर्टेबल व्हेंटीलेटर व पाच हजार मास्क उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे सातत्याने प्रयत्नशिल असुन त्यांच्या पुढाकाराने जालना येथे 150 खाटांच्या उभारण्यात आलेल्या कोव्हीड रुग्णालयासाठी क्रश्ना डायग्नोस्टीक प्रा. लिमिटेड, पुणे या कंपनीच्यावतीने सीएसआर ङ्गंडातुन एलटीव्ही 950 या बनावटीचे 20 पोर्टेबल व्हेंटीलेटर व पाच हजार मास्क कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्रवण मुथा यांनी आज दि. 23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी श्री कडले, सिद्धेवर वाघमोडे आदींची उपस्थिती होती.
Leave a comment