परतुर ग्रामीण रुग्णालयाजवळ घडलेली घटना
परतुर । वार्ताहर
ट्रॅकटर च्या जोरदार धडकेने दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजेच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ घडली आहे या बाबत यहोडक्यात माहिती अशी की आज दि.23 एप्रिल रोजी सकाळी 9 च्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाजवळील हिंदू स्मशानभूमी समोर परतुर शहरकडून ग्रामीण रुग्णालयाकडे मिनी ट्रॅक्टर येत होते तर एङ्ग.वाय. सय्यद हे मोटरसायकल वरून परतुर शहराकडे जात होते,या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली,या अपघातात ग्रामीण रुग्णालय जाङ्गराबाद येथे नेत्रचिकित्सक असलेले एङ्ग.वाय. सय्यद 45 हे जागीच ठार झाले. सय्यद यांनी परतूर येथे ग्रामीण रुग्णालयात ही सेवा बजावली होती.
सय्यद हे नेत्र चिकित्सा सहाय्यक,ग्रामीण रुग्णालय, जाङ्गराबाद येथे कार्यरत होते. ते वरङ्गळ ता.परतूर येथिल असून ते आपल्या खाजगी कामासाठी हिरो होंडा मोटरसायकल क्र.एम एच यू ,7830,पैशन प्रो.या गाडीवरून परतूर शहरात येत असताना ग्रामीण रूग्णालया जवळील स्मशानभुमी समोर त्यांच्या मोटर सायकल ला ट्रॅक्टर ने जोराची धडक दिल्याने ते घटनास्थळीच गतप्राण झाले.धडकेत ट्रॅकटर उलटला असून ट्रॅक्टर चालक शे.ताहेर शे.अकबर हा अपघात झाल्यानंतर पळून गेला होता. परतुर पोलीस ठाण्यात ट्रॅकटर चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
Leave a comment