बीड । वार्ताहर
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या सूचनेनुसार या विषाणूमुळे मृत पावलेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत दाहिनी असावी असे म्हटले आहे. त्यानुसार शहरात दोन विद्युत दाहिनीसाठी एक कोटी रुपये मंजूर करावे तसेच वंचित कार्डधारक गरीब आणि गरजूंना अन्नधान्य वाटप करावे अशी मागणी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे केली आहे
करोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने सर्व नगरपालिकांना विद्युत दाहिनीची व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली आहे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांना याबाबत सूचना केली आहे संभाव्य परिस्थिती लक्षात घेतात करोना विषाणूने मृत पावलेल्या व्यक्तीचा अंत्यविधी हा विद्युत दाहिनी द्वारेच करावा लागतो त्यासाठी जिल्हा नियोजन मधून नाविन्यपूर्ण योजनेतून दोन विद्युत दाहिनीची आवश्यकता आहे त्यानुसार बीड शहरात दोन विद्युतदाहिनीसाठी एक कोटी रुपये मंजूर करावेत अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे तर सध्या लॉक डाऊन परिस्थितीमध्ये गोरगरीब आणि गरजूंना तात्काळ अन्नधान्य वाटप होणे गरजेचे असून वंचित असणार्या कार्डधारकांना तात्काळ अन्नधान्य वाटप करावे अशी मागणी प्रभाग निहाय यादी देऊन तहसीलदार यांच्याकडे केली आहे नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले की संभाव्य परिस्थिती लक्षात घेता विद्युतदाहिनीत आवश्यकता आहे, सुदैवाने बीड शहरात अजून तरी करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही मात्र भविष्यात अशा विद्युतदाहिनी ची गरज आहे त्यामुळे या दोन्ही मागण्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
Leave a comment