माजलगाव । वार्ताहर
तालुक्यातील फुलेपिंपळगाव शिवारात असलेल्या मनकाँट जिनींगांवरील 70 परप्रांतीयांना एक महिना पुरेल ऐवढे अन्नधान्य व मास्कचे गुरुवारी सभापती अशोक डक व पोलीस निरीक्षण सुरेश बुधवंत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या या कामगारांना जिनिंगचे मालक तथा प्रसिध्द उद्योजक रामेश्वर टवाणी यांनी एक महिन्याचे रेशन मोफत उपलब्ध करून दिले आहे .बाजार समितीचे सभापती अशोक डक व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या हस्ते कामगारांना या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. परराज्यातून तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून कामासाठी आलेले बेघर असलेले 70 कुटुंब मनकाँट जिनिंगच्या परिसरात वास्तव्यास आहेत. याकुटुंबांनापुढचे एक महिना पुरेल असे धान्य पुरविण्यात आले यामध्ये गहु , तांदूळ,तेल,मसाला, लहान मुलांसाठी बिस्किटस्, स्वच्छतेसाठी साबण इ. साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रामेश्वर टवाणी, शिवाजी कुल्थे, तुषार जुजगर,कल्याण कुटे ,सुंदर शिनगारे,जस्सी कसाना ,मदन काबला, हरदास चेची,पांडुरंग फपाळ,गोरख देवकते , मख्खन छिंदड, मोरे व राजु फिटर उपस्थित होते.
Leave a comment