पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे दि.19 सांयकाळी पाच वाजेच्या सुमार गावातील 87 घरामध्ये गुंजले नमस्ते सदा वत्सले मातूभूमे च्या गजराने दुमदुमले असून संघाकडून हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आला. घराघरात संघाची शाखा व संघ प्रार्थना संपन्न झाल्याने नवीन चैतन्य दिसून आले आहे, लॉकडाउन च्या काळात गावातील सक्रीय स्वंयमसेवकानी आपल्या राहत्या घरी ठिक पाच वाजता ध्वज लाऊन कुटुंब शाखा लावण्यात आल्या,साडे पाच वाजता सर्वाची प्रार्थना झाली स्वंयमसेवकानी आपल्या परीवारा सोबत खुल्या जागेत शारिरीक आंतर ठेवत शाखा लावण्यात आल्या.नंतर भारत मातेला सागंड घालुन सर्वानी आनंद साजरा केला.
Leave a comment