59 व्यक्तींना अटक, 301 वाहने जप्त तर 26 हजार 808 रुपयांचा दंड
जालना । वार्ताहर
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 277 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 59 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 301 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सामान्य रुग्णालय, जालना येथे दु:खी नगर येथील कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असुन एक 55 वर्षीय महिला न्युमोनिया व मधुमेह आजाराने ग्रस्त असुन त्यांच्या स्वॅबचा नमुना निगेटीव्ह आला आहे. तसेच एक 34 वर्षीय पुरुष न्युमोनिया आजाराने दाखल झाला असुन त्याच्या स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असुन प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे जालना शहरातील तुळजामाता मंदिर, मस्तगड परिसरातील 62 वर्षीय महिला गंभीर ङ्गुफ्ङ्गुसाच्या आजाराने ग्रस्त दि. 15 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे भरती झाली होती. महिलेच्या स्वॅबचा नमुना प्रयोग शाळेत पाठवला असता तो दि. 17 एप्रिल रोजी निगेटीव्ह आला असुन दि. 20 एप्रिल, 2020 रोजी पहाटे 1.40 वाजता सदरील महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 275 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-49,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-9, पोलीस प्रशिक्षण केंद्र-97, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 18 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 751 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 135 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 440 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 21 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 524 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 494, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 80, एकुण प्रलंबित नमुने-23 तर एकुण 305 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 26, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 176 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 18, सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती -275, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-19, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 04, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 135, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.
Leave a comment