कशाचे सोशल -आन -कशाचे डिस्टन्स पगारासाठी निराधारांना नुसता हेल्पटा
कुंभार पिंपळगाव । वार्ताह
रघनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँके समोर ता. 20 सोमवार रोजी निराधारांनी पगारासाठी गर्दी केली होती. ग्रामीण बँकेत तर काही निराधार नागरिकांन व पाचशे रुपयांसाठी जनधन योजनेचे पैसे काढण्यासाठी आलेल्यांना अनेक महिलांना नुसता हेल्पटाच झाला असून त्यांना त्यांच्या पगाराचे पैसे मिळाले नाही या निराधार खाजगी वाहनातून कुंभार पिंपळगाव येथे येण्यासाठी नुसता भुर्दंड सहन करावा लागत असल्याने त्यांच्या हिरमोड झाला.
त्याना अशा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये नुसत्या येण्या-जाण्याचा खर्च द्यावा लागत असल्याने निराधारांन मधून संताप व्याक्त होत आहे ..बँकेने गाव वाईज याद्या लावून गावा नुसार कळविण्यात यावे व निराधार नागरिकांना चक्कर होणार नाही व बँकेत गर्दीही होणार नाही असे मत हेलपट्टा होत असलेल्या निराधार नागरिकांमधून मत व्यक्त केले जात आहे.
Leave a comment