जालना । वार्ताहर

घरावरील स्टील च्या पत्र्या ला विजेचा प्रवाह उतरल्याने तीन वर्षीय बालकाचा  मयत झाल्याची घटना आज दि 19 रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घडली आहे, याबाबत थोडक्यात माहिती अशी की अंबड तालुक्यातील एकलहेरा येथील 

महादेव भगत हे गावात एका पत्र्याच्या घरात पत्नी व मुलासह राहत होते.आज  सकाळी 9 वाजेच्या दरम्यान अचानक घरातील पत्रामध्ये विजेचा प्रवाह  संचार झाल्याने महादेव भगत यांच्या तीन वर्षीय बबलू खेळता खेळता त्या पत्र्याचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा धक्का लागला त्यास  कुटुंबीयांनी तात्काळ त्याला तिर्थपुरी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सध्या लॉकडाऊन असल्याने कुटुंबीयाने अवघ्या तासाभरातच त्याचा अंतविधीही आटोपून टाकावा लागला. दरम्यान, खेळता खेळता आपला मुलगा गमावल्याने महादेव भगत आणि त्यांच्या पत्नीने हंबरडा फोडला. या घटनेमुळे गावात  शोककळा पसरली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.