बदनापूर । वार्ताहर
कोरोनाचा पार्श्वभूमीमुळे संसर्ग पसरु नये म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व देश लाकडाऊन आहे. मात्र बदनापूर तालुक्यामध्ये अवैद्य उत्खनन करणारे व वाळू माफीया बिनधास्त वाहतुक करताना दिसतात. आज बदनापूर तालुक्यातील वरुडी फाटा येथे बदनापूर पोलीसांनी गस्त घालताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास अवैद्य वाळू वाहतुक करणार्या हायवा विना क्रमांक पकडण्यात आला.
फिर्यादी पो.हे.कॉ.सय्यद अफसर सय्यद अजहर यांच्या फिर्यादीवरुन हायवा चालक उध्दव सोमिनाथ शिन्दे व विठ्ठल भाऊसाहेब शिन्दे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून हि कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील, पो.हे.का.सय्यद अफसर, शिवाजी भगत यांनी केली. पुढिल तपास पो.हे.का. ढिल्पे हे करीत आहे.
Leave a comment