जालना, दि. 2 – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना
करण्यात आल्या आहेत. संपुर्ण देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले असुन अशा परिस्थितीमध्येही
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यामध्ये
ठिकठिकाणी चेकपोस्टची स्थापना करण्यात आली असुन या चेकपोस्टच्या माध्यमातुन अनावश्यक वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 84 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर 15 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 26 हजार 808 रुपयांचा दंडही वसुल करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यात 2 एप्रिल रोजी 12 रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. आतापर्यंत 104 रुग्ण विलगीकरण
कक्षात दाखल होते. त्यापैकी 104 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्यापैकी 89 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. 03 रुग्णांचे अहवाल रिजेक्ट तर 12 अहवाल प्रलंबित आहेत. आजरोजी 16 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरी
अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत 114 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी 113 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर शहरे व राज्यातुन आपलेल्या 13 हजार 105 व्यक्तींची तपासणी करुन त्यांचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवासितांची (Contact) संख्या 185 असुन संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे 49, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल- 39, मुलींचे शासकीय वसतीगृह-58 व अंजता ब्लॉक पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 6 जणांना दाखल करण्यात आलेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.