जिल्हाधिकार्‍यांचे आदेश जारी
जालना । वार्ताहर
संपुर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन हे 3 मे, 2020 पर्यंत वाढविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यातही लॉकडाऊनच्या कालावधीस 3 मे, 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पारित केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ज्या ज्या आदेशांना 31 मार्च, 14 एप्रिल तसेच 30 एप्रिल, 2020 पर्यंत अंमलात राहतील असे निर्देश दिले होते ते सर्व आदेश दि. 3 मे, 2020 पर्यंत लागू राहणार आहेत.
आदेशाचे पालन न करणार्‍या व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असल्याचे समजुन कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.