कुंभार पिंपळगाव । वाार्ताहर
घनसांगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रेशन दुकानदार विष्णुपंत कंटुले यांनी रेशन दुकानात सोशल डिस्टस्निगंचे पालन करून धान्य वाटप करण्यात आले सध्या कोरोनाव्हायरस जगभर थैमान घातले आहे या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली होती सर्व सामान्य जनतेला हातावर पोट भरून उदारनिर्वाह करणारी गोरगरीब कुटुंब आहेत गोरगरीब कुटुंबाला सरकार रेशन पुरवठा करत असते लॉकडाऊ नच्या काळात सर्वच व्यवहार बाजारपेठ इंडस्ट्रीज खाजगी उद्योगधंदे बंद असल्याने मजुरांना काम धंदा नसल्यामुळे मजुरांना विविध समाज समस्यांचा सामना करावा लागत आहे याचबरोबर गोरगरीब जनतेला उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून कोरोना व्हायरस आपल्या देशात संसर्गापासून बचाव करण्यासाठी संचार बंदीच्या काळात सोशल डिस्टन तिचे पालन करून सरकारच्या आदेशावरून रेशन दुकानदारांनी सर्वच गरजू तसेच मध्यमवर्गीयांना धान्य वाटप करण्याच्या सूचना तहसीलदार गौरव खैरनार यांनी दिल्या आहेत त्यानुसार गावात धन्य वाटपाचे काम करण्यात आले आहे कुंभार पिंपळगाव येथील विष्णुपंत कंटुले यांनी सूचनांचे पालन करीत धान्याचे वाटप करण्यात आले.
Leave a comment