औरंगाबाद । वार्ताहर
मध्यवर्ती बसस्थानकात खड्डे व खाजगी एजंटांचे साम्राज्य औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात सर्वत्र खड्डेच खड्डे चिखल व घाणीचे साम्राज्य आहेत बस चालकांना आपल्या बसेस या खड्ड्यातून चालवताना तारेवरची कसरत करावी लागते गुलाब नंतर तीन महिन्यानंतर बस सेवा चालू झाली आहे भर पावसाळ्यात औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात सर्वत्र खड्डे व घाणीचे साम्राज्य आहे सर्वत्र चिखल पसरलेला आहे.
एखाद्यावेळेस हे खड्डे चुकवताना एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे असे झाल्यास याला जबाबदार कोण डेपो मॅनेजर यांच्याशी बोलले याबाबत विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले की सध्या कर्मचार्यांचे पगार आलाच पैसा नसल्यामुळे हे काम करण्यासाठी पैसा कुठून उपलब्ध करायचा बाहेरगावाहून येणारे ड्रायव्हर कंडक्टर येथेच विश्रामगृहात मुक्कामी असतात घाणीमुळे व डबक्यात साचलेल्या पाण्यामुळे इथे मच्छर ही खूप झाले आहेत यामुळे अनेक रोगांना निमंत्रण देण्यात येत आहे अगोदरच करुणा या रोगाने देशभरात थैमान घातले आहे त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून काय ड्रायव्हर कंडक्टर या मच्छर यांसोबत रात्र काढावी लागते प्रशासनातर्फे करण्यात कोणतीही सुविधा पुरवल्या जात नाही यामुळे कर्मचार्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात नाराजी वाढत चालली आहे तरी लवकरात लवकर लक्ष घालून हे खड्डे बुजवावीत व तेथील घाण साफ करून कर्मचार्यांच्या आरोग्य चालवलेलं खेळ थांबवावा असे मत ड्रायव्हर कंडक्टर दैनिक लोकप्रश्नशी बोलताना व्यक्त केले.
Leave a comment