औरंगाबाद । वार्ताहर
नुकत्याच झालेल्या औरंगाबाद स्मार्ट सिटी बैठकीत राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी औरंगाबाद शहरात चालवल्या जाणार्या ‘स्मार्ट सिटी बस’ चे कौतुक केले.
हा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट उत्कृष्टपणे चालवला गेला. तसेच राज्यातही हा पॅटर्न लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटीचे बस व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी मांध्यामाशी बोलतांना ही माहिती दिली. संजय कुमार यांनी संपूर्ण टीम प्रशांत भुसारी, ललित ओस्तवाल, मानाजीराव खिल्लारे, विलास खाटकर,सिद्धार्थ बनसोड, माणिक नीला, विशाल खिल्लारे यांची प्रशंसा करत शुभेच्छा दिल्या. येत्या काळात स्मार्ट सिटी बस अनेक गोष्टी स्वत: करणार आहे. सध्या ड्रायव्हर, कंडक्टर, इंफ्रास्ट्रक्चर, पार्किंग, डिझेल या गोष्टी एसटी विभागाकडून घेतल्या आहेत. उर्वरित नव्याने उद्घाटन करण्यात आलेली ई- टिकीटींग, ट्राफिक कंट्रोल, बस मेंटेनन्स, बस क्लिनिंग, इलेक्ट्रॉनिक रुट बोर्ड चेकिंग, कंट्रोलिंग या सर्व गोष्टी येत्या काळात स्मार्ट सिटी बस विभाग स्वत: करेल. यासोबतच लवकरच 32 ठिकाणी इलेक्ट्रॉनिक रुट दाखवण्यासाठी बोर्ड लावण्यात येणार आहेत.
Leave a comment