वन विभागाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी-कोलते पाटील
सावळदबारा । वार्ताहर
सावळदबारा परिसरात खरीप पिकाची मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी नुकसान करत आहेत सावळदबारा परिसरातील ठिकठिकाणी च्या शिवारातील पिके सुध्दा बहरली आहेत कपाशी,मका,चे रोही व वन्य प्राणी नुकसान करत आहेत त्यामुळे वन विभागाने नुकसान झालेल्या शेतक-यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते व परिसरातील शेतकरी करित आहेत सावळदबारा हा डोंगर भाग असल्यामुळे डोंगरातहरीण.बिबट्या.राननडुक्
सावळदबारा परिसरात वन्य प्राणी हे सोयाबीन .कपाशी. चे पिकाचे नुकसान करत आहेत. सावळदबारा सह परिसर या शिवार हे डोंगर भागात असलेल्या मुळे शेतक-यांना पिक जगवणे कठिण असते दिवसा सुद्धा रोहीचे टोळी ही शेतात येऊन नुकसान करतात सावळदबारा, टिटवी. मूर्ती. घाणेगाव, मोलखेडा, देव्हारी, नांदाताडां, पिपळवाडी, हिवरी, नांदागाव, रवळा, जवळा,जामठी,महालब्धा, आदी भाग डोंगर असल्यामुळे येथे रात्री च्या सुमारास डोंगर जवळील शेतात रोही च्या टोळी शेतात येऊन मका ,कपाशी नुकसान करतात सावळदबारा परिसरात कपाशी.सोयाबीन.मका,आदी पिकाची वाचविण्यासाठी शेतक-यांना रात्री राखन करण्यासाठी जावे लागते दिवसा सुद्धा शेतात राखन करावे लागते सावळदबारा परिसरातील डोंगर जवळील पिके मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी पिकाची नुकसान करत आहे वन विभागाने परिसरातील नुकसान झालेल्या शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते,गजानन दांडगे,दिनकर शिपल्कर,एकनाथ सपाटे , विजय रावळकर ,विनोद जाधव,प्ररसराम पवार व सावळदबारा परिसरातील शेतकरी करित आहे.
प्रतिक्रिया:सावळदबारा परिसरातील शेतक-यांचे शेतातील पिकाचे वन्य प्राणी नुकसान करत आहे त्यामुळे वन विभागाने नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी : गुलाबराव पाटील कोलते (शिवसेना उप तालुका प्रमुख)
Leave a comment