औरंगाबाद । वार्ताहर

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव संपुष्टात आणण्यासाठी आपल्या सर्वांना सवयीत बदल करुन नवीन जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे. त्याबाबत मार्गदर्शन करणारी माझे कुटुंब, माझी जबाबदारीमोहिम कोरोनाला हद्दपार करण्यास उपयुक्त ठरणारी आहे. तरी सर्वांनी मोहिमेत सक्रिय सहभागी होत ही लोकचळवळ बनवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. मंत्रालय मुंबई येथून माझे कुटुंब, माझी जबाबदारीमोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरपंचांसोबत आयोजित ऑनलाईन मेळाव्यात केली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातून ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले उपस्थित होते.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण आणि खबरदारीसह जगणे हा प्रतिबंधात्मक उपाय आहे. नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम सर्वाथाने उपयुक्त ठरणार आहे, असे सांगून  मुख्यमंत्री  म्हणाले, राज्यात आज 15 सप्टेंबर पासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. निरोगी जीवनशैलीसाठी सवयींमध्ये बदल करून आपल्या सर्वांना अधिक खबरदारीसह जगावे लागणार आहे, तरच आपण संसर्गाला रोखण्यात शंभर टक्के यशस्वी होऊ. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांचे सर्वेक्षण, आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासोबतच कोरोना विरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील जनजीवन सुरळीत होत असतांना कोरोनाची साखळी तोडणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठी कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावे लागणार असून आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. यासाठी ही मोहिम महत्वाची असून लोकप्रतिनिधी, प्रशासन, सर्व यंत्रणा यांनी  शेवटच्या माणसापर्यंत पोहचायचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपले कुटुंब सुरक्षित केल्यास पर्यायाने आपला महाराष्ट्र सुरक्षित होणार आहे. हा आरोग्य संकटाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण असून निरोगी आयुष्यासाठी जनतेला तयार करण्याचे काम ही मोहिम करणार आहे. महिनाभराच्या काळात राज्यभरात ज्या ठिकाणी ही मोहिम यशस्वीपणे राबविली जाईल त्या परिसरात निश्चित संसर्ग रोखण्यात यश मिळेल.  ही मोहिम सर्वांनी मिळून यशस्वी करत देशासह जगाला नवीन उपाययोजनेचा पर्याय देणारी लोकचळवळ बनवायची आहे. महाराष्ट्र राज्याला अशा लढाया जिंकण्याची पंरपरा आहे. त्याच परंपरेतून कोरोना विरुद्धचा लढा माझे कुटुंब, माझी जबाबदारीया मोहिमेच्या माध्यमातून आपण यशस्वी करु, असा विश्वास मुख्यमंत्री श्री्. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य गेल्या पाच सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करत कोरोना विरुद्ध लढा देत आहेत. राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्याप्रमाणे मुख्यमंत्री युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत त्या पद्धतीने सरपंच, आमदार, सर्व लोक प्रतिनिधीं यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या गावातील, तालुक्यातील, आपल्या कुटुंबाची आरोग्य जपण्याची जबाबदारी घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे. मोठ्या प्रमाणात मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरातून ग्रामीण भागाकडे मार्गक्रमण करत असलेला कोरोना विषाणु वेळीच रोखण्यासाठी जनतेने अधिक खबरदारीने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मोठ्याप्रमाणात लोकांना नियमांचे महत्व सांगून त्यांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही मोहिम उपयुक्त ठरेल. तरी सर्वांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे सांगितले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, माझे कुटुंब, माझी जबाबदारीही मोहिम कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मोहिमेतून प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वसंरक्षणाच्या उपाययोजनांचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. शासनाने कोरोनापासून बचावासाठी आवश्यक आरोग्य सुविधा उभारण्याचे काम केले आहे. आता लोकसहभागातून कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही मोहिम राबविण्यात येत आहे.

यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादचे सरपंच विलास शिंदे यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेली ही मोहिम सर्वार्थाने स्वागतार्ह असून शंभर टक्के ती यशस्वी करण्यात येईल. तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनातून सिल्लोड तालुक्यात डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमामुळे मोठ्याप्रमाणात संसर्ग रोखणे शक्य झाले आहे. याच पद्धतीने ही मोहिमही लोकसहभागातून यशस्वी करण्याचे आश्वासन यावेळी श्री. शिंदे आपले मनोगत व्यक्त करतांना दिले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.