भराडी । वार्ताहर
संपूर्ण देशात कोरोना सारख्या भीषण रोगाने मागील सहा महिन्यापासून थैमान घातले आहे यामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले असून याचा फटका आठवडी बाजार मध्ये दुकाने थाटून आपली उपजीविका भागवणार्या छोटा व्यापार्यांना बसला आहे यासाठी शासनाने लवकरात लवकर आठवडी बाजार सुरू करावे व अशा छोट्या व्यवसायिकांना शासकीय मदत म्हणून किमान 60 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा चे प्रदेश सचिव दादाराव आळणे यांनी जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे
रवीवार दिनांक13 सप्टेंबर रोजी दादाराव आळणे यांनी हे निवेदन दिले सिल्लोड तालुक्यात अनेक छोटे मोठे व्यावसायिक आठवडाभर विविध गावांमध्ये भरणार्या बाजारांवर अवलंबून आहेत अशा छोट्या व्यावसायिकांवर बाजार बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे अशा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ त्यांना शासकीय मदत म्हणून 60 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी व त्यांची पुढील उपासमार टाळण्यासाठी आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या यावेळी भारतीय जनता पार्टीओबीसी मोर्चा प्रदेश सचिव दादाराव आळणे यांचेसह सुधाकर तात्या सोनवणे भाजपा ओ बी सि मोर्चा तालुका अध्यक्ष, गणेश वानखेडे,गजानन राऊत बंडू महाकाळ राज मोरे , भाऊसाहेब तमखाने रामेश्वर नेमाडे,नंदू नेमाडे , युगेश वानखेडे,ईतर आठवडी बाजारातील व्यापारी, कार्यकर्ते उपस्थित होते
Leave a comment