शनिवारी दोनदा घडले बिबट्याचे दर्शन; शेतान मध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे 

फर्दापूर । वार्ताहर

वरखेडीखुर्द(ता.सोयगाव) शिवारातील शेत,वाड्या वस्तीच्या परीसरात राखीव जंगलातील बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने परीसरातील शेतकर्‍यांन मध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे,दि.12 शनिवार रोजी भरदिवसा वरखेडीखुर्द शिवारातील शेतांन मध्ये बिबट्याचे दोन वेळेस दर्शन घडल्याने भयभीत झालेल्या शेतकर्‍यांनी वनविभागास माहिती दिल्याने शेतकरी व वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सुमारे  तीन तास हा संपूर्ण परीसर पिंजून बिबट्याचा शोध घेतला यावेळी बिबट्या दिसला नसला तरी बिबट्याच्या पायाचे ठसे मात्र मिळून आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की अजिंठा राखीव जंगला लगत असलेल्या फर्दापूर जवळील वरखेडीखुर्द शिवारातील शेतांन मध्ये मागील पंधरा दिवसापासून बिबट्या व त्याच्या बछड्याचा मुक्तसंचार सुरु असल्याची चर्चा या परीसरातील शेतकर्‍यांन मध्ये होती मात्र प्रत्यक्षदर्शी नेमकी माहिती देण्यास असमर्थ ठरत असल्याने याबाबी कडे कोणी फारसे लक्ष दिले नाही,दरम्यान दि.12 शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास दिलीप मगरे (रा.वरखेडीखुर्द ता.सोयगाव) हे त्यांच्या शेतातील मचानीवर बसून पिकांचे राखण करीत असतांना त्यांना शेतात मुक्त संचार करतांना बिबट्या दिसून आला बिबट्या दिसताच भयभीत झालेल्या दिलीप मगरे यांनी याबाबत त्वरित गावातील नागरीकांना माहिती दिली गावातील नागरिकांनी त्या शेताकडे धाव घेऊन बिबट्याचा शोध घेतला मात्र तो पर्यंत शेतातील पिकांचा व झाडाझुडपाचा सहारा घेऊन बिबट्या गायब झाल्याने सर्व नागरिक गावाकडे परतले त्यानंतर सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास वरखेडीखुर्द गावाजवळील धरणात काही जण मासेमारी करीत असतांना त्यांना शेजारील शेतात बिबट्या एका निलगायी सोबत झटापट करतांना दिसून आला या झटापटीत नीलगाय बिबट्याच्या तावडीतून निसटून राखीव जंगलाच्या दिशेने पळून गेली तर बिबट्या शेतात गडप झाला,दरम्यान या माहिती वरुन शेतकरी नितेशसिंग राजपूत,मनोज ठाकूर,गजानन जामुंदे,सुनिल ताटू वनरक्षक जीवन दांडगे,काळे आदिनी या परीसरात शोध मोहीम राबवली असता त्यांना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाले नसले तरी सुनिल ताटू यांच्या शेतातील एका झुडपात बिबट्याने पूर्वी शिकार केलेल्या एका हरणाचे व कुत्र्याच्या शरीराचे अवशेष सापडले तर शेतात काही ठिकाणी बिबट्याच्या पायाचे स्पष्ट ठसे मिळून आले आहेत,दरम्यान या संपूर्ण प्रकाराने परीसरातील शेतकर्‍यांन मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने शेतशिवारात मुक्तसंचार करणार्‍या या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांन कडून करण्यात येत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.