कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील विनोद पापालाल दायमा या शेतकर्याचा शेतातील गट नंबर 291 मध्ये असलेला दीड एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला तसेच परिसरातील मागील आठवड्यात लिंबोणी येथील गणेश काळे यांच्या शेतातील गट नं. 226 मधील ऊस जळाला शेतातून गेलेल्या लाईटचा तारांच्या घर्षणाने स्पार्किंग होऊन ऊस जळाला कुंभार पिंपळगाव येथील सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ऊसाला आग लागली त्या दीड एकर ऊस जळाला वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रार करुनही तारांची दुरुस्ती न केल्यामुळे ही घटना घडल्याचे शेतक-यांनी म्हणटले आहे. यापूर्वी 2018 मध्ये देखील दायमा यांच्या शेतात पार्किंग होऊन सहा एकर ऊस जळाला होता त्याचा पंचनामाही केला होता .मात्र वीज वितरण कंपनीने अजूनही शेतक-यांना नुकसान भरपाई दिली नाही. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी नसता वीज वितरण कंपनीच्या विरोधात कायदेशीर पावले उचलण्यात येईल असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
Leave a comment