बोरगांव बाजार । वार्ताहर
लोकसत्ता युवा संघटना महाराष्ट्र राज्य सिल्लोड तालुका सचिवपदी याकुब कुरैशी तर सर्कल सरचिटणीसपदी शफी शेख यांची निवड करण्यात आली. लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इलाही शेख व मराठवाडा अध्यक्ष इस्माईल शेख यांच्या आदेशाने व औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष फैसल शेख व सिल्लोड तालुका अध्यक्षप विशाल चव्हाण यांच्या शिफारशीनुसार लोकसत्ता युवा संघटना, सिल्लोड तालुका सचिवपदी याकुब कुरैशी ,तर बोरगांव सर्कल सरचिटणीसपदी शफी शेख तर अजिंठा सर्कल अध्यक्षपदी सरफराज शेख व बोरगांव सारवाणी सर्कल अध्यक्षपदी मुमताज पठाण, सर्कल उपाध्यक्षपदी मुकीम पटेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी मराठवाडा अध्यक्ष इस्माईल शेख,शेख कलीम,आरेफ अबरारखान,शेख शकिल,विशाल चव्हाण,यांच्यासह संघटनेचे पदाधिकार्यांची उपस्थिती होती,या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातुन अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment