औरंगाबाद । वार्ताहर
केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणाविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसने क्रांती चौक येथे तीव्र निदर्शने केली. यावेळी आंदोलनात मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आज देशात आर्थिक अराजकता पसरलेली आहे. काही ठरावीक उद्योजकांना फायदा करण्याच्या हेतूने पंतप्रधान यांनी देशातील सार्वजनिक मालमत्तेचे खाजगीकरण केले आहे.
रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक, पेट्रोलियम क्षेत्र, विद्युत विभागाचे क्षेत्र यांचे खाजगीकरण करत आहे. सन 2014 पासून आजपर्यंत देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून सरकार जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. केंद्रातील भाजपा सरकार वरुन लोकांचा विश्वास पुर्णपणे उठलेला आहे. देशातील जनतेची दिशाभूल करुन चीन, पाकीस्तान, सुशांतसिंग, धर्मवाद या विषयावर लक्ष केंद्रित करुन खाजगीकरणाचा कट केला जात आहे. आर्थिक मंदी आल्याने सामान्य माणूस व शेतकरी हवालदिल झाले आहे. उद्योजक, लघु उद्योजक, व्यापारी, शासकीय कर्मचारी, मोलमजुरी करणारे मजूर त्रस्त झाले आहे. अशी मागणी करत तीव्र निदर्शने करण्यात आले.
Leave a comment