इटखेडा । वार्ताहर
पैठण रोड येथील अग्रसेन विद्या मंदिर शाळेत 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष सत्यनारायणजी रतनलालजी अग्रवाल उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या संगीत शिक्षिका सौ.नेहा नेरळकर व सौ. दिप्ती जसोरिया यांनी देशभक्तीपर गीताचे सादरीकरण करून कार्यक्रमास शोभा आणली.
कार्यक्रमास शाळेचे विश्वस्त केशव लीला, शाळेचे संस्थापक अध्यक्ष भगवानदासजी टिबडीवाला, उपाध्यक्ष प्रफुल्लकुमार अग्रवाल, सचिव अॅड.मुकेश गोयंका, कोषाध्यक्ष सत्यनारायणजी रामगोपालजी अग्रवाल, किशोर पाडीया, आलोकजी अग्रवाल, सुनिल सावा तसेच इतर सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणे पण देशभक्तीने भारलेल्या वातावरणात आजचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षांनी मार्गदर्शन करतांना असे सांगितले की शिक्षकांनी स्वार्थ त्यागाने विद्यार्थ्यांना घडविले पाहिजे तसेच शाळेचे घोषवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी कृतीतत्पर असावे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य सुभाष धवन, पूर्व प्राथमिक तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.रेशम बंब, अधिक्षक अजय सोनुने, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.नमीता देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.अंशु विश्वकर्मा यांनी केले.
Leave a comment