सोयगाव । वार्ताहर
कोरोना व्हायरसने सर्वत्र कडेथैमान घातले असून ह्या महामारी साठी डॉक्टर व पोलीस प्रशासन,ग्रामपंचायत,अंगणवाडी सेविका, दिवस-रात्र ड्युटी करत आहे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत बनोटी पोलीस चौकीच्या पोलीसांना जय संघर्ष वाहन तर्फे सन्मानपत्र देण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला बनोटी पोलीस चौकी असून ह्या चौकी अंतर्गत 32 गावे येतात ह्या ठीकाणी पाच पोलीस कर्मचारी असुन कोरोना संदर्भात चेकपोस्टवर ड्युटी दररोज काही गावातील छोटे-मोठे वाद मिटविणे क्राईमचा शोध, कमी मनुष्यबळ असतांनाच देखील बनोटी पोलीस चांगले काम करीत आहे कामाचा भार जास्त असुन देखील सदैव आपली ड्युटी चांगल्याप्रकारे करतात अशा कर्मचारींचा वेगवेगळ्या संस्थानी संन्मानपत्र दिले आहे.
जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट निमित्ताने व कोरोना महामारी च्या संकटात पोलीस प्रशासनाने चांगले काम केले व नेहमीच पोलीस प्रशासन चांगले काम करत असते हे औचित्य साधून जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे सदस्य व पदाधिकारी यांनी आज सोयगाव तालुक्यातील बनोटी आऊट पोस्ट चे पोलीस बनोटी बीट जमादार योगेश झाल्टे, सुभाष पवार, दिपक पाटील, सतिश पाटील, विकास दुबेले यांच्या जय संघर्ष ग्रुप चे संन्मान पत्र देऊन सन्मान केला या वेळी, डॉ.मल्लुसिंग राठोड, रहेमान तांबोळी, सागर नगरे, विवेकानंद बागुल व प्रविण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उपस्थित होते व ह्या मराठा प्रतिष्ठान यांच्या वतीने विवेकानंद बागुल यांनी जय संघर्ष ग्रुप चे पदाधिकारी यांना संन्मान पत्र देऊन सन्मान केला.
Leave a comment