सोयगाव । वार्ताहर

जिल्हा परीषद प्रशाला सोयगांव येथील भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रशालेत ध्वजारोहण मुख्याध्यापक आनंदा इंगळे यांच्या हस्ते व प्रतीमा पुजन पर्यवेक्षक गिरीष जगताप व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय मिसाळ यांनी केले. सर्व देश कोरोनाच्या सावटाखाली वावरत असतांना स्वातंत्र्य मिळाल्यानतंर शालेय विद्यार्थ्यांवीना साजरा केलेला सोहळा हा पहीलाच सोहळा होता .

आजचा ध्वजारोहण सोहळा हा विद्यार्थ्यांवीना करतांना प्रशालेतील सर्व शिक्षकांनी दोन व्यक्ती मध्ये सुरक्षित अंतर, तोडांवर मास्क , हाताला संनिटायझरचा वापर व वरीष्ठ कार्यालयाने दिलेल्या सुचनांचे पालन करून उंच आवाजात राष्ट्रगीत घेऊन साजरा केला. आजच्या दिनी विद्यार्थी नसल्यामुळे त्यांनी दिलेल्या गाव दणाणून टाकणाऱ्या घोषणां, प्रभात फेरी, त्यांची किलबिलाट याचा अभाव जाणवला. शाळेच्या ग्राऊंडवर होणारी कवायत आनंदा  इंगळे सरांचा ’सावधान’ असा बुलंद आवाज आणि फडकणारा तिरंगा या सोबत आसमंत दणाणून टाकणारे राष्ट्रगिताचे गायन , झेंड्याला सलामी देताना  देशभिमानानी भरुन येणारी इवलीशी छाती ,

सांस्कृतिक कार्यक्रम , बोबड्या बोलीपासून देशभक्तीपर गितगायन, नगरपंचायतीचे  अध्यक्ष,नगरसेवक,पालक, विविध पक्षांचे पदाधिकारी, सदस्य,पञकार बांधव , ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी यांनी विद्यार्थ्यांना दिलेली कौतूकाची व बक्षीसांची पाठीवर मिळणारी थाप याचाही अभाव जाणवला . शेवटचा गोड कार्यक्रम बिस्किट वाटप बच्चे कंपनी आपल्याला बिस्कीट मिळणार या आनंदात असायची तो ही आनंद या कोरोना या आजाराने हीरावुन घेतला.

याप्रसंगी मुख्याध्यापक आनंदा इंगळे पर्यवेक्षक गिरीष जगताप , जयकृष्ण नाईक , सुकदेव पाटील , अशोक पवार , दौलतसिंग परदेशी , पंकज रगडे , अनिल ठाकूर , संजीव जोशी , शिवराम आगे , सुनील शेटे , प्रविण चावळे , अरूण जगदाळे , सुधाकर निबांळकर उपस्थित होते . भारत भूमी ही पुण्यवंतांची भूमी. देशासाठी त्याग, तपस्या, बलिदान करणारे आम्ही भारतवासी. संपूर्ण जगाला शांततेचा मंत्र आम्हीच दिला. स्वातंत्र्य.. समता.. बंधुता या त्रयीवर विविध भाषा.. विविध जाती.. धर्म.. पंथ यांना सुखाने जगण्याची हमी देणारी आध्यात्मिक वारसा लाभलेली आमची भारतीय संस्कृती. जगाच्या कल्याणा साठी दुरीतांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सुर्ये पाहो ही समस्त जगासाठी प्रार्थना करणारी ही भारतभूमी. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संसाराचे आणि प्रसंगी प्राणाचेही बलिदान देणार्‍या स्वातंत्र्यविरांना आणि आजही हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जीवाची बाजी लावली ते सैनिक तसेच हे स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अतुलनीय शौर्य दाखवणार्‍या, संसारत्याग करणार्‍या, प्रसंगी फाशीचे दोर गळी घेणार्‍या अशा सर्व ज्ञात अज्ञात लाखो स्वातंत्र्यवीरांना व आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महान हुतात्म्यांनी आपले प्राण त्यागले त्यांचे स्मरण करून देशाच्या सीमेवर आपले स्वातंत्र्य अबाधित रहावे यासाठी अहोरात्र झटणार्‍या आपल्या जवानांना सलाम करुन आपला देश लवकरात लवकर कोरोना पासून मुक्त व्हावा, अशी प्रार्थना करून सर्व देशबांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

============

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.