खुलताबाद । वार्ताहर
कोरोना विषाणूने (कोविड -19) संपूर्ण जग व्यापून टाकले आहे. जगभरात, या विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या आणि ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. लॉकडाऊन दरम्यान लोक घरी सुरक्षित आहेत. त्याच वेळी, कोरोनामधील फ्रंट लाइन योद्धा रोज आपल्या तळहातावर जीव ठेवून या विषाणूविरूद्ध लढत आहेत. त्या कोरोना योद्धांचा गौरव करण्यासाठी खुलताबाद येथे महाराष्ट्र पत्रकार संघच्यावतीने बुधवार (दि.12) ऑगस्ट रोजी खुलताबाद येथील नवीन बसस्थानक ईदगाह मैदान जवळील रहिवासी मोहम्मद सिराजोद्दीन ख़्वाजा सूफ़ी यांनी पुढाकार घेऊन कोविड 19 काळामध्ये खुलताबाद येथील गोरगरीब जनतेसाठी दोन वेळेचे जेवन घरपोच उपलब्ध करुन दिले.याप्रसंगी खुलताबाद येथील ज़रज़री ज़रबक्ष दर्गा भद्रा मारुती मंदिर परिसरातील गोरगरीब,तसेच बसस्थानक परिसरातील गोरगरिबांना व तहसील कार्यालय समोरील राहणार्या पारधी समाजातील गोरगरीबांसाठी जेवनाची सोय केली. याकामासाठी समाजसेवक मिर्झा अब्बास बेग यांनी सहकार्य केले.
काम करणार्यांना ’कोविड योध्दा’ म्हणून सन्मानपत्र देण्यात आले. कोरोना सारख्या भयंकर आजरावर मात करणे हे आपल्या सर्वांचा कर्तव्य आहे. तरीही अश्या कठिन परिस्तिथित स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोरगरीबांसाठी दोन वेळेचे जेवन, राशन किट, जेवणासोबत औषध उपचार तसेच दुसर्या राज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी पूर्णपणे पाठपुरावा करुन त्यांना त्यांचे मूळगावी पाठवून देणे हे सर्व सामाजिक कामे या देशातील आणिबाणीच्या काळात आपले कर्तव्य म्हणून बजावणार्या या व्यक्तींना ’कोविड योद्धा’ म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघामार्फत त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी खुलताबाद येथील मोहम्मद सिराजोद्दीन ख़्वाजा सूफ़ी, समाजसेवक मिर्झा अब्बास बेग, नगरसेवक नवनाथ पाटिल बारगळ यांच्यासह नंदू कारभारी बारगळ, मोहम्मद आरिफ, इस्माईल खान,शेख सादिक़ यांना पुष्पहार घालून त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सचिन बैरागी, राज्य उपाध्यक्ष विनोद शर्मा, विलासराव केळकर,आझादजी अव्हाड, तसेच संघचे राज्य कार्यकारी अध्यक्ष संतोषजी आदिंच्या हस्ते कोविड योद्धांचा गौरव करण्यात आला.
Leave a comment