सोयगाव । वार्ताहर
जळगाव जिल्ह्यातील तीन तरुणांचा धारकुंड (बनोटी) (ता.सोयगाव) येथील धबधब्या खालील तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी घडली होती. मृत्यू मुखी पडल्यांची नावे अशी .राकेश रमेश भालेराव (वय 25)गोदावरी कॉलनी जळगाव, राहुल चौधरी (वय23) हनुमान नगर जळगाव, गणेश भिकन सोनवणे (वय 23)राधानगरी जारगांव (जि. जळगाव). असे आहे. सोमवारी सकाळी ह्या तरुणांचा मृतदेह शोधमोहीम साठी औरंगाबाद येथुन अग्णिशमन दलास पाचारण करण्यात आले होते परंतु घटनास्थळी चे ठिकाण ते औरंगाबादचे अतंर 120 की.मी. असल्याने शोधमोहीम साठी विलंब होत असल्याने सोयगाव पोलिस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या सह जमादार सुभाष पवार, सतिष पाटील, दीपक पाटील, विकास डुबिले, विकास लोखंडे यांनी जवळपास आस पासच्या गावातील मच्छीमारांना सोबत घेऊन शोधमोहीम सुरू केली तेव्हा अकरा वाजता दोन तरुणांचा मृतदेह सापडले असून दरम्यान तीन वाजता अग्णिशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचल्यावर तिसर्या तरूणांची शोधमोहीम सुरू झाली काही वेळानंतर तिसरा मृतदेह सापडला.
बनोटी गावापासुन सात किलोमीटर अतंरावर धारकुड हे धार्मीक स्थळ आहे ह्या ठिकाणी तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबा पर्यटक, भाविकांचे आकर्षण ठरत आहे बाजुला खडकाच्या कपारमध्ये महादेवाची पिंड आहे. धो धो कोसळणार्या धारेखाली अंघोळ करण्याचा मोह आवरता येत नसल्याने येथे नेहमी अशा दुर्दैवी घटना घडतच असतात . श्रावण महीन्यात नेहमी भाविकांची याठिकाणी गर्दी होत असते परीसरासह घाटमाथ्यावरील तरुणासह शेजारील जळगाव जिल्हातील पर्यटक मोठया संख्येने येथे भेट देतात तसेच दर्शनासाठी येतात. जळगाव जिल्हातील मित्र परिवार मिळुन नऊ जण रविवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास दुचाकीने या ठिकाणी आले तेथील मनमोहक धबधबा आणि नैसर्गिक सौंदर्यात सर्व जण मनसोक्त आनंद घेत होते तब्बल दोन तास झाल्यानंतर घराकडे निघण्याच्या तयारीत असतांना एकमेकांची चौकशीत तीन जणाचा थांगपत्ता मिळत नसल्याने तेथील तलावात तेथे जमलेले पर्यटक आणि सहा मित्रांनी शोधाशोध करुनही मिळाले नाहीत अंधार पडत असल्याने मित्र परिवारांनी बनोटी चौकी गाठली व घडलेली घटनेची माहिती दिली. दरम्यान तिघा तरुणांची उत्तरीय तपासणी बनोटी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविण कदम यांनी केली. पुढील तपास सोयगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, जमादार सुभाष पवार, सतिष पाटील, दीपक पाटील, विकास डुबिले, विकास लोखंडे आदी तपास करीत आहे. सोयगांव तालुक्यात रूद्रेश्वर मंदिर’ वेताळवाडी किल्ला मुल्डेश्वर संस्थान तसेच धारकुंड व जोगेश्वरी संस्थान असे अनेक निसर्गरम्य ठिकाण आहेत श्रावण महिन्यात अनेक तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे परंतु सोयगांव तालुक्य सोयगावच्या डोंगराळ भागात येत असून पाऊस जास्त झाल्याने अनेक ठिकाणी तलाव तुडुंब भरलेले आहेत तरी येणार्या तरूणांनी कोणत्याही तलावात पोहण्यासाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


Leave a comment