औरंगाबाद । वार्ताहर
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुख्य सचिव कार्यालयात उपसचिव पदी नियुक्ती झाल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीचे आदेश आज निर्गमित झाले आहेत.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी 19 एप्रिल 2018 रोजी औरंगाबाद जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांची प्रशासकीय सेवेची सुरुवात 22 ऑगस्ट 2012 रोजी गडचिरोली येथून सहायक जिल्हाधिकारी पदापासून झाली. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्धा आणि ठाणे येथे काम केले. औरंगाबाद जिल्हाधिकारी पदी येण्यापूर्वी ते सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
Leave a comment