सोयगाव । मनिषा पाटील
सोयगाव शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या रुद्रेश्वर लेणीच्या डोंगरा च्या धबधब्याचा जोर वाढता झालेला असून श्रावणाच्या पूर्वतयारीसाठी निसर्गाने पुढे सरसावले आहे. निसर्गाचे वैभव लाभलेल्या सोयगाव तालुक्याला श्रावणाच्या आधीच रुद्रेश्वर लेणींचे सोंदर्यात वाढ झाली होती.
या सोंदर्य वाढीमुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सोयगावचा निसर्ग पुढे सरसावला असून रुद्रेश्वर लेणीला वैभव प्राप्त करून देणारा डोंगरातील नागमोडी धबधबा लेणीच्या पायथ्याशी कोसळत आहे.रुद्रेश्वर लेणीत गाभार्यात महादेवाची पिंड आणि गणपती मंदिर आहे या ठिकाणी श्रावणात भाविक मोठ्या संख्येने येऊन श्रावणाची पूजा करतात या मंदिराच्या गाभार्यातून झिरपणारे धबधब्याचे पाणी आणि डोंगरातून खळखळणारा धबधब्याच्या आवाजाने पर्यटक आकर्षित होतात या गाभार्यात असलेल्या गणपती आणि महादेवाची पूजा करण्यासाठी येणार्या भाविकांना मात्र हा धबधबा मंत्रमुग्ध करून टाकत असतो,या धबधब्याच्या उगम सिल्लोड तालुक्यातून झालेला आहे.डोंगराच्या आडवळणी रांगा मधुन वाहणारा धबधबा नागमोडी आहे त्यामुळे या नागमोडी धबधब्याला पहिल्या नंतर पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते, जळगाव, धुळे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, बुुुलढाणा, कळमसरा, लोहारा शैदुर्णी आदी भागातून या ठिकाणी पर्यटक येतात
कोरोना संसर्गमूळे धबधबा एकाकी
सध्या कोरोना विषाणूच्या फैलावाच्या घटनांमुळे यंदाच्या श्रावणात मात्र पर्यटकांसाठी रुद्रेश्वर लेणी बंद राहणार असल्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात येणार आहे.मात्र रुद्रेश्वर लेणीत प्रवेशबंदी असणार त्यामुळे श्रावणाच्या चिंब सरी आणि धबधब्याला यंदाच्या श्रावणात पाहता येणार नाही असे बोलले जात आहे.
Leave a comment