वैजापूर । वार्ताहर

  वैजापूर-शिऊर रोडवर जरुळ फाटा शनिवार दि 1 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास नाना ढाब्याजवळ इर्टीगा कार पलटी होऊन अपघात घडला या अपघातात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शिऊरहून वैजापूरकडे येत असताना जरुळ फाटा जवळील नाना ढाबा जवळ इरटीका कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या कारमध्ये पाच तरुण हे जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार मोईस बेग यांनी व सहकार्याने घटनास्थळी धाव घेऊन जखमीना ताबडतोब उपचारसाठी वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. समीर संतोष जाधव वय 19 वर्षे रा दुर्गानगर वैजापूर प्रविन बबन बरबडे वय 23 वर्षे नितीन बबन बरबडे वय 25 वर्षे शुभम प्रविन निंबाळकर वय 23 वर्षे एकाचे नाव माहीत नाही. हे सर्व रा नवजिवन कॉलनी वैजापूर यांना उपचारासाठी वैजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता समीर संतोष जाधव गंभीर जखमी असल्याने उपचार करून औरंगाबादला उपचारासाठी जात असताना रात्री 1:10 दरम्यान रस्त्यात मृत्यू झाला. चौघांवर वैजापूर येथे उपचार सुरू आहेत. मयत समीर संतोष जाधव वय 19 वर्षै यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.