औरंगाबाद । वार्ताहर
शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले शैक्षणिक मासिक जीवन गौरवच्या सहसंपादीका सौ.छाया बैस या जिल्हा परिषद हायस्कूल लोहा जिल्हा नांदेड येथील सहशिक्षिका आहेत.या आधुनिक सावित्रीचे व्यसनमुक्तीच्या चळवळीमध्ये मोलाचे योगदान आहे. ग्रामिण भागांमध्ये दारू ,सिगारेट तंबाखू खाऊ नये म्हणून सातत्याने समाजातील नागरिकांना प्रोबोधन करत आलेल्या आहेत. शालेय परिसरातील धुम्रपानाच्या विरोधात अनेक वेळेस विविध दैनिकातून लेखन केले.
अशा परिस्थितीत व्यसनाधीनतेने पछाडलेल्या लोकांना बाहेर काढणे आणि व्यसनाधीनतेकडे जाणारे पाऊल रोखणे हे एक सामाजिक उत्थानाचे अत्यंत मोलाचे कार्य बैस यांनी केले.शालेय विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य, पोस्टर संदेश ,भिंती चित्रे, परिसंवाद ,वाद विवाद स्पर्धा घेऊन जनजागृती करत आहेत.अशा ह्या आधुनिक सावित्रीच्या सामाजिक व प्रेरणादायी कार्याच्या विक्रमाची कोल्हापूर येथील महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे मुख्य संपादक यांनी दखल घेतली. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये बैस यांची नोंद करण्यात आली असून त्यांना विशेष राष्ट्रीय पुरस्कार 2020 चे मानकरी ठरविण्यात आले आहे.प्रमाणपत्र व स्मृतीचिंन्ह सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. त्यांच्या या कौतुकाबद्दल जीवन गौरवचे संपादक रामदास वाघमारे, उपसंपादक डी.बी.शिंदे, सहायक संपादीका डॉ.रत्ना चौधरी, संदीप सोनवणे,मीरा वाघमारे, नागनाथ घाटुळे, महादेव हवालदार, वैशाली भामरे,रूपाली बोडके, वंदना सलवदे,गीता केदारे यांनी अभिनंदन केले.
Leave a comment