वैजापुर । वार्ताहर
शेतकर्यांना पिळणार्या महातिघाडी सरकारच्या विरोधात दुध दरवाढीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण राज्यभर आज रोजी महाएल्गार आंदोलन करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरासह तालुक्यातील भगूर फाटा, लाडगाव, दहेगाव शेड फाटा, शिवूर बंगला,लोणी याठिकाणी आज भाजपच्या वतीने दूधाला 10 रूपये अनुदान द्यावे,दूधाला 30 रूपये हमी भाव द्यावा,दूध पावडर निर्यात साठी 50 रूपये अनुदान द्यावे या प्रमुख मागण्यासाठी महाएल्गार राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांसह शेतकर्यांनी सोशल डिस्टन्स पाळत आपला सहभाग नोंदवला होता.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment