औरंगाबाद । वार्ताहर
वेरुळ खुलताबाद ही देवस्थाने सोलापुर-धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्र.52 वर असल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतुक चालु असते. तसेच खुलताबाद ते फुलंब्री या मार्गावर सुध्दा मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतुक चालु असते.श्रावण महिण्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी,यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ब)अन्वये श्रावण महिण्याच्या प्रत्येक शुक्रवारी रात्रीचे 20.00 वाजेपासुन ते मंगळवारी सकाळी 08.00 वाजे पर्यंत वरील मार्गाने जाणारी सर्व जड वाहतूक दौलताबाद टी पाँईट पासून ते वेरुळ पर्यंत व फुलंब्री ते खुलताबाद पर्यंत भाविकाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे.
यासाठी खालील प्रमाणे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. औरंगाबादकडून -कन्नड-धुळे कडे जाणारी सर्व जड वाहने ही दौलताबाद टी पॉईट- माळीवाडा- आनंद धाबा- कसाबखेडो फाटा मार्गे वेरुळ- कन्नड कडे जातील, कन्नड कडून येणारी सर्व जड वाहने वेरुळ- कसाबखेडा फाटा- आनंद धाबा- माळीवाडा मार्गे औरंगाबादकडे येतील. फुलंब्री मार्गे खुलताबाद-कन्नडकडे जाणारी सर्व जड वाहने औरंगाबाद - कसाबखेडा फाटा- वेरुळ मार्गे कन्नड कडे जातील. वेरुळ -खुलताबाद- कडून फुलंब्री कडे जाणारी वाहने ही वेरुळ -कसाबखेडा फाटा- माळीवाडा मार्गे औरंगाबादकडे जातील. तसेच दिनांक 10 ऑगस्ट रोजी औरंगाबाद कडून कन्नडकडे जाणारी सर्व जड वाहने दौलताबाद टी पॉईट-माळीवाडा-आनंद धाबा- कसाबखेडा फाटा-देवगाव रंगारी- गल्लेबोरगाव -देवगाव रंगारी- कसाबखेडा फाटा मार्गे औरंगाबादकडे जातील. तरी सर्व वाहनधारकांनी या वाहतुकीतील बदल लक्षात घ्यावा, त्याप्रकारे वाहतूक करावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.
Leave a comment