औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 281 जणांना (मनपा 132, ग्रामीण 149) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 9961 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 276 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13842 झाली आहे. आजपर्यंत एकूण 469 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3412 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 163 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 38, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 57 आणि ग्रामीण भागात 63 रूग्ण आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (65)
औरंगाबाद (4), फुलंब्री (2), गंगापूर (19), सिल्लोड (9), वैजापूर (12), पैठण (9), सोयगाव (8), टाकळी पांगरा,पैठण (1), वंजाळा, सिल्लोड (1)
सिटी एंट्री पॉइंट (38)
सिडको महानगर (3), भावसिंगपुरा (1), हर्सूल (1), शिवाजी नगर (1), शेंद्रा एमआयडीसी परिसर (1), बालाजी नगर (3), आडगाव खुर्द (1), राजीव गांधी नगर (1), संजय नगर (1), राम नगर (1), कुंभेफळ (1), आडगाव (1), हर्सूल (1), मयूर पार्क (3), म्हसोबा नगर (2) सातारा परिसर (1), पेठे नगर (1), गंगापूर, आंबेगाव (1), रांजणगाव (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), पडेगाव (2), नारेगाव (1), वेरूळ (1), वैजापूर (1) कन्नड (1), बजाज नगर (1), सिडको (1), लिंबे जळगाव (1), राहुल नगर, रेल्वे स्टेशन परिसर (1), चित्तेगाव (1)
मनपा (3)
पहाडसिंगपुरा (1), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), रोहिला गल्ली, सिटी चौक (1)
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत रौफ कॉलनीतील 74 वर्षीय महिला आणि खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील 50 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Leave a comment