विहामांडवा । वार्ताहर
दिवसेंदिवस कोरोनाचा ग्रामीण भागातही फैलाव झपाट्याने वाढत चालला आहे पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. गावातील 32 वर्ष व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव आला असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सबंधित रुग्णाला काही दिवसापूर्वी ताप,सर्दी,खोकला ही लक्षण दिसल्यामुले त्याने सुरवातील गावातील रुग्णालयात तपासणी करुण औषध उपचार केले. परंतु त्याला बरे न वाटल्यामुळे औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दाखल करण्यात आले असता त्यांला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे कोरोना तपासणी केली असता सोमवार दिनांक 6 जुलै रोजी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने विहामांडवा व परिसरात एकच खळबळ उडाली. संबधीत रुग्नाच्या संपर्कातील 16 लोकांना जिल्हा परिषद शाळा विहामांडवा येथे संस्थात्मक विलगीकरण करून त्यांचे स्वाब घेण्यात आले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. यादव सोनकांबळे यांनी दिली.
संबंधित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येतात विहामांडवा पोलिस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, सहाय्यक फौजदार संजय मदने व आप्पासाहेब माळी यांनी रुग्णाच्या राहत्या घराजवळचा संपूर्ण परिसर सील करून कंटेनमेंट घेऊन घोषित केला आहे. त्याप्रमाणे पुढील तीन दिवस गावांमध्ये संपूर्ण व्यवहार बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळण्याचे आव्हान केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आव्हान पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.
Leave a comment