पर्यायी पुलावर  गाड्या स्लीप झाल्याने ट्राफिक जाम’ 

पाचोड । वार्ताहर

पाचोड ते अंबड रस्त्याचे काम कल्याण कन्स्ट्रक्शन कंपनी ठाणे मार्फत संथ गतीने काम प्रगतीपथावर  आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पुलाचे काम सुरू असून ते काम अर्धवट असून काम अर्धवट असल्याने थोड्या पावसाने पर्याय पुलावर चिखल होऊन गाड्या स्लिप होण्याचे प्रमाण वाढले असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तसेच जो रस्ता बनवला आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरूम टाकता माती टाकण्यात आली आहे त्यामुळे गाड्या घसरण्याचे  प्रमाण वाढले आहे जो मुरूम वापरण्यात येत आहे तो मातीयुक्त असून यामुळे या रस्त्यावर जो मातीचा थर देऊन रस्ता तयार करण्यात आला आहे तो या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे पूर्णपणे  चिखल झाला असून या चिखलामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहे तर चारचाकी वाहने रस्त्यामध्ये फसत असून काही वाहने रस्त्याच्या खालीही जात आहे.सध्या पाऊस सुरू असल्याने या मातीच्या रस्त्यांवर प्रचंड चिखल साचल्याने वाहनधारक अक्षरश: कंटाळले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,पाचोड ते अंबड दरम्यान रस्त्याच्या कामामुळे मोठी अडचण येत आहे. हे काम  सुरू होऊन  जवळपास दोन वर्ष झाले असूनही हे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे तसेच जे काम चालू आहे मातीच्या भराव ज्याठिकाणी केला आहे अशा ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाला आहे. या चिखलामुळे लहान-मोठी वाहने  घसरुन अपघातही होत आहेत. पाचोड खूर्द व चिंचखेड जवळील रस्त्याच्या अर्धवट कामामुळे वाहने रस्त्याच्या चिखलात फसत असल्याने. चिखलाने वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठया रांगा लागत आहे. चिंचखेड,कानडगाव, झोडेगाव, करडगाव आदी या भागातिल नागरिक हैराण झाले आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने रस्त्यामध्ये मातीचा वाफर केल्याने पावसाळ्यात ही समस्या निर्माण होत आहे. या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांचे  बेहाल होत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.