औरंगाबाद । वार्ताहर
जैन टॅग या सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या महिला गु्रप तर्फे हिपेटायटीस बी या आजारावर उपाय असलेल्या लसीकरण शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यावेळी 430 नागरीकांनी शिबीराचा लाभ घेतला. 3 वेळेस घेतल्या जाणा-या या लसीचे 10 वर्षापासुन ते 68 वर्षा पर्यत प्रत्येकाला घेणे आवश्यक आहे. या लसीमुळे असाध्य आजारापासुन संरक्षण होते अशी माहिती जी आय वन हॉस्पीटलचे डॉ.महेश राठोड यांनी दिली.
या शिबीरासाठी डॉ.वैभव गंजेवार, डॉ.सदिप भालसिंग, डॉ. अशोक मोहिते, डॉ.विनय अन्वर, डॉ.मुकेश राठोड यांचे सहकार्य मिळाले आहे. जी आय वन हॉॅस्पीटलच्या सहकार्याने आयोजीत या मोफत शिबीराचे आयोजन जैन टॅग तर्फे प्रोजेक्ट चेअरमेन दिपीका बडजाते, किर्ती पाटणी, मिताली काला, स्वाती कासलीवाल यांनी केले तर शिबीर यशस्वी करण्यासाठी जैन टॅगच्या अध्यक्षा रिना ठोले, सपना पाटणी, याशिका पांडे, मोनिका चांदीवाल व सर्व जैन टॅगच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यकमासाठी सी.ए.विशाल पाटणी, शितल बडजाते, अमित पाटणी, समिर ठोले यांचे सहकार्य मिळाले. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी दिली.
Leave a comment