औरंगाबाद । वार्ताहर
कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनलॉक जरी होत असले. तरी धार्मिक कार्यक्रम, यात्रा यावर मात्र निर्बंध कायमच आहेत हे आपण जाणतो. त्यामुळे यावर्षी गुरुपौर्णिमाप्रित्यर्थ प.पू. गुरुवर्य शंकर (नाना) महाराज,पाथर्डीकर व गुरुमाता सुमतीबाई शंकरराव कुलकर्णी यांच्या गुरूपादुका पूजनाचा आणि लघुरुद्र अभिषेक सोहळा हा उत्सव परंपरा खंडित होऊ नये या करिता रविवार 5 जुलै 2020 रोजी भव्यदिव्य प्रकारे न करता घरगुती पद्धतीने करण्याचे योजिले आहे,गुरु परिवाराच्या वतीने सर्व भक्ताना सुचना करण्यात आली आहे की
गुरुपौर्णिमेला जास्तीत जास्त नामस्मरण व तुम्हाला योग्य वाटत असेल ती उपासना ही आपल्या घरी राहूनच या गुरुपौर्णिमेला श्री गुरूंच्या चरणी ‘तुझे तुलाच अर्पण’ या उक्तीनुसार प.पू. गुरुवर्य शंकर (नाना) महाराज,पाथर्डीकर यांना अर्पण करावी. त्यामुळे शक्यतो सर्वच नामस्मरण आणि सोबतच्या इतर उपासनेची रीतसर नोंद करावी कारण जरी आपापल्या घरी ही उपासना करणार असलो तरीही ती नाथ परिवाराच्या वतीने एकत्रित अशी देखील उपासना असणार आहे. तरी त्या शिस्तीचे पालन होईल. दरवर्षी प्रमाणे होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम या वर्षी रद्द करण्यात आला आहे, याची सर्व नाथभक्तांनी नोंद घ्यावी असे शिवदास शंकरराव कुलकर्णी (पाथर्डीकर) वंशज, श्री.सुमंत शंकरराव कुलकर्णी (पाथर्डीकर),वंशज यानी कळविले आहे.
Leave a comment