सावळदबारा । वार्ताहर
परिसरात दहा दिवसापासुन पाऊस नसल्यामुळे पिके सुकू लागले होते पुन्हा दुबार पेरणी संकट उभे राहते काय की यांची भिती शेतक-यांना होती परंतु शुक्रवार ,शनिवारी ,सोमवारी सकाळी रोजी परिसरातील ठिकठिकाणी पाऊसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळून पिकाना जिवदान मिळाले तर काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्यामुळे पुन्हा पेरणी करावी लागली आहेत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा सह परिसरात गेल्या दहा दिवसापासुन गायब झालेल्या पावसाचे दमदार आगमन झाले सुरूवातीला पावसाचे आगमन झाले त्यानंतर शेतक-यांनी पेरणी केली नंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते काही भागात तर पिकाना पाणी देताना दिसत होते शुक्रवारी रात्री सोमवारी सकाळी सावळदबारा सह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पिकाना जिवदान मिळाले त्यामुळे शेतकरी मध्ये आनदाचे वातावरण आहेत आता शेतकरी पिकाना खत देण्यासाठी शेतकरी लगबग दिसणार आहेत
प्रतिक्रिया : सावळदबारा परिसरातील शेतक-यांना जादा दराने खतेची विक्री केली जात आहेत असे शेतकरी सांगत आहेत त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ लक्ष देण्यात यावे शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते, व शेतकरी करित आहेत. सावळदबारा परिसरातील शेतकरी खत घेण्यासाठी दुकानावर गर्दी करतात त्यामुळे कृषी सेवा केंद्र दुकानदारानी दुकानबाहेर भाव फलक लावण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते व शेतकरी करित आहेत
Leave a comment