स्व वसंतराव नाईक जयंती निमित्त जि.प सदस्य गोपीचंद जाधव यांचा उपक्रम
फर्दापूर । वार्ताहर
स्व वसंतराव नाईक महाष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी शेतकर्यांन साठी अनेक हितकारक निर्णय घेऊन कृषीक्रांती घडवून आणली म्हणून आज ही त्यांना संपूर्ण जगभरात हरीतक्रांतीचे प्रणेते व आधुनिक महाराष्ट्राचे जनक म्हणून ओळखले जाते असे प्रतिपादन जि.प सदस्य गोपीचंद जाधव यांनी केले दि.1 बुधवार रोजी स्व वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त फर्दापूर येथील माणिकराव पालोदकर विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे सभापती उस्मान खॉ पठाण माजी सरपंच विठ्ठल आगळे ग्रा.पं सदस्य विलास वराडे,रशिद पठाण संजय दामोदर,मनोज जाधव,इरफान पठाण,धारासिंग राठोड,प्रदिप जाधव आदींची उपस्थिती होती यावेळी मा.विद्यालयाच्या आवारात जि.प सदस्य गोपीचंद जाधव व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले दरम्यान स्व वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जि.प सदस्य गोपीचंद जाधव यांच्या तर्फे फर्दापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांना एन.95 मास्क व वृक्षांची रोपे ही भेट देण्यात आली यावेळी साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे पो.कॉ दीपक सोनवणे,नारायण खोडे,ज्ञानेश्वर सरताळे,बाजीराव धनवट,धनराज खाकरे,प्रविण गवई,संजय कोळी सचिन काळे,सचिन केंद्रे,मिलिंद मेढे,ज्योती परळे आदींची उपस्थिती होती.
Leave a comment