औरंगाबाद । वार्ताहर
जनता कर्फ्युच्या नावाखाली काही मोजक्याच व्यापारी वर्गाला फायदा मिळावा, या करीता जनतेची दिशाभूल व शेतकरी वर्गाचे नुकसान केल्या बाबत व या प्रकरणाची चौकशी होऊन दडांत्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच शेतकरी बेरोजगार, छोटे मोठे व्यापारी शेतमजुर यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन मानवधिकारच्या प्रदेश कार्याध्यक्ष अनिता वानखडे यांनी तहसीलदार मार्फत विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
तालुक्यातील बाजार ज्या दिवशी भरतो त्या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचे काही मोजकेच आणि निकटवर्ती व्यापार्यांना फायदा व्हावा, या करिता स्थानिक प्रशासन आणि ते व्यापारी यांनी संगनमताने 3 दिवसीय जनता कर्फ्यु लावलेला आहे. यात मोल मजुरी व शेतकरी वर्गाचे भरता न येणारे नुकसान झालेले आहे. करिता पदाचा व अधिकाराचा गैरफायदा घेतल्या प्रकरणी संबंधित अधिकार्यांना तत्काळ निलंबित करून जनता कर्फ्यु आवश्यक असलेल्या प्रभागातच लावावा विशेष म्हणजे या बाबत कुठलेही लेखी आदेश न काढता कुठलीही पुर्व कल्पना न देता हा मनमानी कारभार स्थानिक प्रशासनाने केला आहे. वरिल बाबत तात्काळ कारवाई व्हावी, नसता आमरण उपोषण करु असा इशारा दिला आहे. असे निवेदन मानवधिकार च्या प्रदेश कार्याध्यक्ष अनिता वानखडे यांनी तहसीलदार मार्फत विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले आहे, व त्याची प्रत राज्यपाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहे.
Leave a comment