औरंगाबाद । वार्ताहर
नवनियुक्त शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्या अध्यक्षतेखाली आज भडकलगेट येथील अड संजय पगारे जेष्ट विधिज्ञ मुंबई उच्च न्यायलाय औरंगाबाद यांनी शहर काँग्रेस पक्षात आपल्या समर्थकसह प्रवेश केला आहे.
यावेळी काँग्रेसचे मोहसिन अहेमद, डॉ पवन डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड.संजय पगारे हे काँग्रेसचे माजी आमदार स्वतंत्रसैनिक रावसाहेब एन डी पगारे यांचे चिरंजीव आहेत. रावसाहेब एन डी पगारे हे 1957 ते 1962 पर्यंत हे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात आमदार म्हणून कार्यरत होते. अॅड.संजय पगारे यांचे काका अड एस डी पगारे हे सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रजिस्ट्रा पदावरून सेवानिवृत झाले आहे. अॅड.संजय पगारे यांच्यासह सर्व समर्थकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने घेतल्याबल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Leave a comment