बोरगांव बाजार । वार्ताहर
बोरगांव बाजार ता.सिल्लोड येथील ज्ञानेश्वर काकडे नुकत्याच लागलेल्या तहसीलदार पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम आल्याबद्दल त्यांचा बोरगाव बाजार गावकर्यांतर्फ शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या ज्ञानेश्वर काकडे व त्यांचे वडील माणिकराव काकडे यांचा बोरगांव बाजार येथे समस्त गावकर्यांनतर्फ भव्य सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व (आशिर्वाद) देण्यात आले, ज्ञानेश्वर काकडे यांनी तहसीलदार पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम येऊन बोरगांव बाजार गावचे नावलौकिक केले आहे,यावेळी काकडे यांनी गावकर्यांचे सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून,जनतेची सेवा करण्यासाठी या पदाचा अधिकाधिक उपयोग करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी कौतिरराव चव्हाण,केशवराव भोजणे, नंदुशेठ चौधरी, पोपटराव चव्हाण,तंटामुक्तगाव समिती अध्यक्ष दत्ता चव्हाण,उपसरपंच रामदास साखरे,सरपंचपती नंदु चव्हाण,माजी सरपंच समाधान साखरे,सुनिल सोनवणे,लक्ष्मण साखरे, यशवंत सनांन्से,पोलीस पाटील योगेश उमरिया,पं.स.सदस्य सत्तार बागवान,नितीन उमरिया, अनिल चव्हाण, रामनाथ भोजणे,कृष्णा साखरे, विलास चव्हाण,ज्ञानेश्व साखरे,हरून पठाण,प्रमोद चव्हाण,सलीम शाहा,ज्ञानेश्वर साळवे, शांताराम साखरे, सर्जेराव साखरे, यांच्यासह मोठ्यासंख्येने गावकर्यांची उपस्थिती होती.
Leave a comment