20 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरूध्द गुन्हा दाखल
फर्दापूर । वार्ताहर
अवैधरीत्या वाळूची चोरटी वाहतूक करणार्या ट्रकवर कारवाई करीत पोलिसांनी 3 ब्रास वाळू सह ट्रक असा एकूण 20 लाख 9 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन दोघांन विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे सा.फौ पोपटराव कांबळे पो.कॉ ज्ञानेश्वर सरताळे,मिलिंद मेढे,रविंद्र सावळे प्रविण गवई यांच्या पथकाने रात्री 12 वाजेच्या सुमारास पळसखेडा (ता.सोयगाव) येथे केली आहे.
या बाबत पोलिस सुत्रांनकडून प्राप्त अधिकृत वृत्त असे की औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या पळसखेडा येथे अवैधरीत्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून पोलिसांना प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांच्या पथकाने रविवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास पळसखेडा येथे छापा मारला असता गावा लगतच ट्रक (क्र.एमएच 17 के. 5638) मधून वाळू उतरविण्यात येत असल्याचे पोलिसांना दिसून आले दरम्यान पोलिसांनी चौकशी करुन ट्रक चालका कडे वाळूच्या परवान्याची मागणी केली असता त्याच्या कडे कोणताही परवाना मिळून न आल्याने पोलिसांनी अवैध वाळू तस्करी प्रकरणी कारवाई करीत 9 हजार रुपये किमंतीची 3 ब्रास वाळू व 20 लाख रुपये किमंतीचा ट्रक असा एकूण 20 लाख 9 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी ट्रक चालक अतुल अर्जुन ननवरे(वय 26) व मालक मिलिंद बाळकृष्ण कोळी (दोघे रा.बांभोरी जि.जळगाव) यांच्या विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास साहाय्य पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांच्या मार्गदर्शना वरुन जमादार बाजीराव धनवट करीत आहे.
Leave a comment