छोटे व्यापारी मात्र झाले परेशान
पैठण । नंदकिशोर मगरे
पैठण शहरात एका आठवड्यात एकून 7 कोरोना बाधित आढळ्याने तथाकथीत व्यापार्यांच्या नेत्यांनी लोकप्रतिनिधींना सोबत घेवून व इतर व्यापा-यांना विश्वासात न घेताच जनता कर्फ्यूच्या नावाखाली दि 26 ते 28 पर्यंत शहर बंद ठेवण्याचा फर्मान काढल्याने सामान्य व्यापारी पुरता हैराण झाल्याचे पहावयास मिळत आहे
22 मार्च पासून कोरोना साथीचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने तिन महिने लॉकडाऊन जाहिर केला होता .त्यातच कामगार वर्ग ,ठेकेदार व छोटे मोठे व्यावसायीक हताश झाले होते अता कुठेतरी व्यवहार सुरळीत चालत असल्याने सदरिल वर्गात उत्साह बघायला मिळत होता त्यातच पुन्हा लॉकडाऊन जाहिर करणे स्थानिक प्रशासनाच्या आधीन नसल्याने अता पुन्हा इतर व्यापारी वर्गाला विश्वासात न घेता हम करे सो कायदा असा कांगवा करत मुठभर नेत्यांनी लोकप्रतिनिधीशी संगनमत करून दहा मिनीटाच्या बैठकीत तिन दिवसाचा जनता कर्फ्यू लागू केल्याने सामान्य व्यापारी पुन्हा भरडल्या जात असल्याच्या प्रतिक्रिया लोकप्रश्न प्रतिनीधीशी बोलतांना व्यापा-यांनी व्यक्त केल्या .साहेब आम्हाला ही विश्वासात घ्या , छोटे का होईना आम्ही पण व्यापारी आहोत . भावनीक साद या ठिकाणी छोट्या व्यापा-यांनी घातली असून . आमचा दिवसभराचा नफा फक्त पाचशे रूपयांच्या आत आहे धनदांडग्या व्यापा-यांनी याचा विचार करावा असे ही यावेळी सामान्य व्यापारी दबक्या आवाजात बोलत आहेत.
Leave a comment