बोरगांव बाजार । वार्ताहर
बोरगांव बाजार व परिसरात मागील पंधरापासुन जास्त तापमान व उकाड्यामुळे नागरिक परेशान झाले होते,व पंधरा दिवसाच्या विश्राती नतंर दिनांक 26 जुन वार गुरूवारी मध्यराञी जोरदार पडलेल्या पाऊसमुळे बळीराजा सुखावला,पिकांना जीवन मिळाले आहे.
बोरगांव बाजार,सोनाप्पावाडी, खातखेडा,बोरगांव सारवाणी, म्हसला,बोरगाववाडी,दिडगांवसह परिसरात मागील पंधरा दिवसापासुन पाऊसाने दाडी मारल्यामुळे जास्त तापमान व उकड्यामुळे नागरिक परेशान झाले होते व जुनच्या सुरूवातीला पेरणी केलेले पिक चांगले उगले होते या पंधरादिवसाचा पाऊसाने खंड दिल्यामुळे उगलेली पिक सुकत होते तर उशिराने पेरणी झालेली बी पाऊस वेळेवर नसल्यामुळे उगलीच नव्हती यामुळे शेतकर्या पुन्हा या लाँकडाऊनच्या काळात दुबार पेरणीच संकट येते कि काय यामुळे शेतकरी चिताग्रस्त झाला होता,पण दिनांक 26 जुन रोज गुरूवारी मध्यराञी जोरदार पाऊसाला सुरूवात झाली,बोरगांव व परिसरातील प्रमुख असलेल्या पुर्णा-चारणा नद्यासह सर्व लहान-मोठ्या नद्या,नाले,पुर व तलाव-कँनाल हे पन्नास ते साठ टक्के क्षमतेने पुर्ण भरलेले आहे,या पाऊसामुळे पुन्हा एकदा बळीराजा वरिल दुबार पेरणीचे संकट टळले आहे,तसेच मोठ्या जोमाने पिकातील अंर्तगत मशागतीच्या कामाबरोबकच पिकाना खते देण्यास,बाद (नउगवलेले) बियाणे लावणेसह,फवारणी करण्यास मग्न झालेला दिसुन येते आहे,व परीसरात गुरुवारी मध्यराञी पडलेल्या पाऊसामुळे पिकांना जिवदान तर मिळाले व यावेळी शेतकरी (समाधानी) सुखावलेला दिसुन आला.
Leave a comment