बोरगांव बाजार । वार्ताहर
भराडी ता.सिल्लोड येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेत, प्रशालेचे विध्यार्थी ज्ञानेश्वर काकडे नुकत्याच लागलेल्या तहसीलदार पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम आले,शाळे तर्फ त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन शालेय समिती अध्यक्ष पुंडलिकराव खोमणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,यावेळी मुख्याध्यापक सुभाष साळवे यांनी व संस्था अध्यक्ष राम भोगले यांनी केलेले अभिनंदन पत्र ज्ञानेश्वर काकडे यांना देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ज्ञानेश्वर काकडे हे येथील उच्च माध्यमिक विद्यालयात इ स 2010 मध्ये बारावी कला शाखेची परीक्षा उत्तीर्ण झाले होते, बारावीत ते महाविद्यालयातून दुसर्या क्रमांकानी उत्तीर्ण झाले होते, याच महाविद्यालयात गुणवत्ता वाढ उपक्रमांतर्गत घेतल्या जाणार्या विविध परीक्षेच्या माध्यमातून त्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागण्याबरोबरच,त्याची भक्कम पायाभरणी पण झाली होती, या बळावरच ज्ञानेश्वर काकडे यांनी तहसीलदार पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम येऊन शाळा व संस्थेचे नावलौकिक केले आहे, यावेळी काकडे यांनी शाळा व गुरुजन यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून,जनतेची सेवा करण्यासाठी या पदाचा अधिकाधिक उपयोग करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.यावेळी कोंडीबा पांडव,किशोर जाधव,अनिल बैनाडे, संग्राम बैनाडे, सोमिनाथ सैवर, रावसाहेब कलवले, महेश बहाळकर,ईश्वर कसबे,शिवनारायन गौर,विजयर रत्नपारखी, विठ्ठल सोनोवणे,जगदीश निकम,प्रदीप महाजन,सुरेश शेळके,अशोक देसले यांच्यासह अन्य शिक्षक शिक्षेकतर कर्मचार्यांची उपस्थिती होती.
Leave a comment